ई-पीक पाहणी ॲप

 

ई-पीक पाहणी ॲप - आपल्या शेतातील पिके आणि बांधावरील झाले यांची नोंद सातबारावर मोबाइल व्दारे आपणच करा.

 आपल्या शेतातील पिके आणि बांधावरील झाडे यांची नोंद सातबारावर पीक पाहणी ॲप चा उपयोग करून कशी करावी या संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

पीक पाहणी ॲप मध्ये पिकांचा किंवा झाडांचा फोटो अपलोड करावा लागतो. तुमच्या मोबाईलमध्ये असलेले गॅलरी मधील फोटो या ठिकाणी अपलोड करता येत  नाही त्यामुळे जेंव्हा तुम्ही फोटो काढण्यासाठी कॅमेरा सुरू कराल त्यावेळी तुम्ही तुमच्या शेतात असणे गरजेचे आहे.

-पीक पाहणी ॲप संदर्भात थोडंसं..

१५ ऑगस्ट २०२१ रोजी मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते ऑनलाईन पद्धतीने पिक पाहणी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे. पीक पाहणी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना पिकनोंदणीसाठी तलाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता उरली नाही. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती आपल्या मोबाईल व्दारे स्वत: भरणे शक्य होणार आहे. शेतकऱ्याने भरलेली माहिती सातबऱ्यावर येणार आहे त्यामुळे योग्य पद्धतीने बिनचूक माहिती या ठिकाणी भरायची आहे

-पीक पाहणी मोबाईल ॲप  इंस्टॉल करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. -

Ø    मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.

Ø    गुगल प्ले स्टोअरच्या सर्च बार मध्ये e peek pahani हा key word टाका.

Ø    ज्या ॲपवर Department of revenue, government of maharashtra असे लिहिलेले असेल त्या ॲपवर क्लीक करुन ॲप इंस्टॉल करा.

पीक पाहणी मोबाईल ॲप इंस्टॉल झाल्यावर..

v   e peek pahani हे ॲप इंस्टॉल झाल्यावर ओपन करा.

v    e peek pahani ॲप ओपन होत असतांना काही सूचना दिसेल त्या वाचून घ्या.

v   सर्व सूचना वाचल्यानंतर Next या बटनावर क्लिक करा.

v  मोबाईल नंबर प्रविष्ट करा अशी सूचना येईल त्या खाली एक चौकट दिलेली असेल त्या चौकटीमध्ये तुमचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर टाका Next या बटनावर click करा.

v  त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका गाव निवडा. सर्व माहिती व्यवस्थित निवडल्यानंतर Next या बटनाला क्लिक करा.

v   त्यानंतर तुम्हाला तुमच्या जमिनी संदर्भातील माहिती भरावी लागणार आहे.

v   पहिले नावमधले नावआडनावखाते क्रमांक गट क्रमांक यापैकी एक कोणताही पर्याय वापरुन तुम्ही तुमचे खाते निवडु शकता.

v  खाते निवडण्यासाठी शक्यतो पहिले नाव भरावे.

v  दिलेल्या चौकटीमध्ये मराठी भाषेमध्ये तुमचे नाव टाईप करा आणि Search या बटनावर क्लिक करा.

v  खातेदार निवडा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या नावासारखे इतर खातेदारांची यादी सुद्धा तुम्हाला दिसेल त्यापैकी तुमच्या नावाच्या खात्यावर क्लिक करुन Next बटनावर क्लिक करा.

v  तुमच्या नावाच्या खाली तुमच्या खात्याचा नंबर या ठिकाणी आलेला असेल त्या समोरील चौकटीत टिक करा आणि Next या बटनला क्लिक करा.

v आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे असा मेसेज आपणास दिसेल. आपणास मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास ' मोबाईल क्रमांक बदलया बटनावर क्लिक करा.

v  तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक बदलायचा नसल्यास Next बटनाला क्लिक करा.

v त्यानंतर एक OTP तुमच्या मोबाईल नंबरवर पाठविला जाईल तो OTP दिलेल्या चौकटीत अचूकपणे टाका आणि captcha code भरा.

v  अशा पद्धतीने पीक पाहणी ॲप मधील नोंदणी प्रक्रिया पुर्ण झालेली असेल.

Dashboard  वर तुम्हाला खालील पर्याय दिसतील.

a)     परिचय.

b)    पिकांची माहिती नोंदवा.

c)     कायम पड नोंदवा.

d)    बांधावरची झाडे नोंदवा.

e)     अपलोड.

f)     पिक माहिती मिळवा.

 

1)  परिचय या टॅबला क्लिक करून तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरू शकता तुमचा फोटो देखील अपलोड करू शकता.

2)  पिकांची माहिती नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

Ø  पिकांची माहिती नोंदवा या बटनावर क्लिक करा.

Ø पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती अशा दोन सदराखाली या ठिकाणी शेतकऱ्यांना माहिती भरावयाची आहे.

Ø पीक पेरणीची माहिती या सदरामध्ये खाते क्रमांक निवडा या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर क्लिक करा. या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा खाते क्रमांक निवडायचा आहे.

Ø  शेतजमिनीचा भूमापन किंवा गट क्रमांक निवडायचा आहे.

Ø त्यानंतर तुमच्या जमिनीसंदर्भातील पोट खराब संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी आपोआप दर्शविली जाईल.

Ø  हंगाम निवडा या पर्यायाखाली दिसत असलेल्या चौकटीवर क्लिक करून खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा.

Ø   पिकांचा वर्ग या पर्यायावर क्लिक करुन निर्भेळ पिक म्हणजेच एकच पिकमिश्र पिक म्हणजेच अनेक पिकेपॉली हाउस पिकशेडनेट पिकपड क्षेत्र या पैकी योग्य पर्याय या ठिकाणी निवडावा.

3)   मुख्य पिकांसहित दुय्यम पिकांची नोंद करा.

·    मिश्र पीक निवडल्यानंतर तुमच्या शेतामध्ये लावलेली पिके आणि त्यांचे क्षेत्र टाईप करा.

·    मुख्य पिकदुय्यम आणि दुय्यम अशी पिकांची वर्गवारी या ठिकाणी करावी लागणार आहे.

·   जल सिंचनाचे साधन या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीवर क्लिक करुन सिंचनाचे साधन निवडा.

·  त्यानंतर सिंचन पद्धत निवडायची आहे जसे की, ठिबक सिंचनतुषार सिंचनप्रवाही सिंचन किंवा अन्यप्रकारे सिंचन या पैकी एक निवडा.

·   लागवडीचा दिनांक या पर्यायाखाली दिलेल्या चौकटीमध्ये पिकांची लागवड केल्याचा दिनांक टाकायचा आहे.

·    त्यानंतर तुमच्या शेतातील जे मुख्य पीक आहे त्या पिकाचे छायाचित्र या ठिकाणी घ्यायचे आहे. त्यासाठी कॅमेरा आयकॉन वर क्लिक करा.

·      फोटो काढल्यावर submit या बटनावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुमच्या पीकांची माहिती सबमिट आणि अपलोड झालेली आहे.

पिकांची माहिती या पर्यायावर क्लिक करून तुम्ही भरलेली माहिती बघू शकता जर तुम्हाला असे वाटत असेल की माहिती चुकीची भरली गेली आहे तर ही माहिती तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता.

4)   बांधावरील झाडे नोंदविणे..

शेतकऱ्यांच्या बांधावर बरीच झाडे असतात शेतकरी ही झाडे स्वतः 7/12 वर नोंदवू शकतात.

   I.  त्यासाठी पीक पाहणी ॲपच्या डॅशबोर्डवर दिसत असलेल्या बांधावरील झाडे या बटनावर क्लिक करा.

   II.   खाते क्रमांक निवडा.

  III.   शेताचा गट क्रमांक निवडा.

  IV.   दिलेल्या यादीतून तुमच्या शेताच्या बांधवावर जे झाड असेल ते निवडा.

    V.   झाडाची संख्या दिलेल्या चौकटीत टाका.

  VI.    सर्वात शेवटी बांधावरील झाडाचे छायाचित्र अपलोड करा.

  VII.    फोटो काढल्यावर सबमिट या बटनावर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद !..