आधार कार्ड मोफत डाऊनलोड करा

 

नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड मोफत डाऊनलोड कसे करावे?
HOW TO FREE DOWNLOAD MASKED AADHAAR.

सध्याच्या काळात अगदी प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आधारकार्ड ही अनिवार्य गोष्ट आहे. तसेच सीमकार्ड, रेशनकार्ड यासारख्या गोष्टीसाठी देखील आधारकार्ड आवश्यक आहे. जुने झाल्यामुळे आधार कार्डावरची माहिती पुसट होते. त्यामुळे आधार कार्ड ग्राह्य धरले जाईल किंवा नाहीयाची शाश्वती नसते. अशावेळी तुम्ही नवीन आधार कार्ड मोफत डाऊनलोड करु शकता. तुम्ही UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन झटपट नवे आधार कार्ड मिळवू शकता.

येथे क्लिक करा. या संकेतस्थळावर लॉगइन करुन तुम्ही नियमित आणि मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करु शकता. मास्क्ड आधार कार्डावर केवळ शेवटचे चार क्रमांक दिसतात. तुम्ही हव्या त्या प्रकारे आधारकार्ड डाऊनलोड करु शकता. यासाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.

आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा.

    1.     सर्वप्रथम eaadhaar.uidai.gov.in/ या संकेतस्थळावर जा.
    2.     संकेतस्थळावर गेल्यानंतर आपला 12 अंकी आधार क्रमांक टाका.
    3.    तुम्हाला मास्क्ड आधार कार्ड हवे असल्यास तसा पर्याय निवडावा.
    4.     स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाईप करावा.
    5.     त्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करावा.
    6.     ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर VERIFY AND DOWNLOAD बटन दिसेल ज्यावर क्लिक करुन आपण आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.
    7.    डाऊनलोड केलेले आधारकार्ड हे पासवर्ड प्रोटेक्टेड असेल सदर आधार ओपन करण्यासाठी आपणास आधारवरील स्वत:च्या नावाची पहीली चार इंग्रजी अक्षरे कॅपीटल आणि जन्मवर्ष टाकावे लागेल. जसे की, तुमचे नाव जर ASHISH असेल आणि जन्मवर्ष जर 1985 असेल तर पासवर्ड ASHI1985 असा राहील.

आधार कार्डाची पडताळणी अशाप्रकारे करु शकता.

1.     सर्वप्रथम uidai.gov.in/verify या थेट लिंकवर लॉगिन करा.

2.   पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला समोर टेक्स्ट बॉक्स दिसेल. त्यामध्ये तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका.

3.     त्यानंतर कॅप्चा कोड टाका.

4.     यानंतर व्हेरिफाई बटणावर क्लिक करा.

5.  तुमचा आधार क्रमांक योग्य असल्याचा एक मेसेज पेजवर डिस्प्ले होईल. त्यामध्ये नमूद केलेल्या आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्या.

6.     याशिवायतुमचा खासगी तपशीलही या पेजवर दिसेल.

पॅनकार्ड आधार कार्डशी अशाप्रकारे लिंक करा.

a. आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगिन करा.

b.     इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

c. त्यानंतर तुमचा पॅन नंबरआधार क्रमांकतुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

d.     यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

e.     सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद !..