डिजीटल सात-बारा

आता ७/१२ काढणे झाले अगदी सोपे -

                 

                    पूर्वी ७/१२ मिळविण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असत. ७/१२ मिळण्यास विलंब होत होता. परंतु आता ऑनलाईन पद्धतीने केव्हाही, कधीही व कोठेही आपण आपला ७/१२ मिळवू शकतो. त्यामुळे शासकीय कामासाठी लागणारा आणि सर्व कार्यालयात चालणारा डिजीटल स्वाक्षरी असलेला ७/१२ महाराष्ट्र शासनाच्या खालील वेबसाईट वरून आपल्याला डाऊनलोड करता येईल.   

          https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/

ही वेबसाईट ओपन केल्यावर खालील प्रमाणे पेज ओपन होईल .👇


     यामध्ये Regular Login आणि OTP Based Login असे 2 पर्याय दिसतील यातील Regular Login साठी तुम्हाला तुमचे अकाऊन्ट तयार कराव लागेल ते New User Registration मधुन तयार करता येईल किंवा तुम्ही थेट मोबाईल क्रमांक टाकूनही मोबाईल वर आलेला OTP टाकून Login करू शकता. त्यानंतर खालीलप्रमाणे पेज ओपन होईल.


            यामध्ये जिल्हा-तालुका-गाव निवडुन त्यामध्ये गट/सर्वे क्रमांक टाकल्यावर तसेच तुमच्या या खात्यावर रिचार्ज करून तुम्हाला ७ /१२८ अमिळकत पत्रिका या काढता येतील. यासाठी 15 रु प्रत याप्रमाणे रक्कम आकारली जाते. याद्वारे काढलेला ७/१२ हा कोणत्याही शासकीय कामासाठी वापरता येतो.

              धन्यवाद !.... 🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

धन्यवाद !..